<em>नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व The Blue Wings युवा मंडळा तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा….!</em>
मालवण | प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि The Blue Wings युवा मंडळ यांच्या वतीने आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
यामध्ये झेंडावंदन आणि त्यानंतर स्वातंत्र्याचा आवाज हा कार्यक्रम मालवण मधील फोवकांडा पिंपळ या मध्यवर्ती ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर च्या कालावधीतील भारत या विषयावर विविध नागरिकांची मते जाणून घेण्यात आली..
यावेळी वैशाली तळाशिलकर, महेश जावकर, प्राजक्ता तुळसकर, लक्ष्मण वळंजू, देविदास खुडपे, एस व्ही प्रभूखानोकर, सी जी भावे, एस आय बनसोडे, एस व्ही काळसेकर, व्ही एम ठाकूर, कार्तिकी बिरमोळे, साक्षी रावराणे, माधवी तिरोडकर, जे सी सावंत, एस ए पाटकर, पवार आर एस, प्रभुदास आजगावकर, हे कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
दुपार नंतर मालवण जवळच्या न्हिवे या गावात युवकांची निसर्ग भ्रमंती (Nature Trail) आयोजित करण्यात आली होती.. सावंतवाडीचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी presentation दिले, मालवण येथील डॉ. कमलेश चव्हाण यांनी या प्रसंगी परिसरातील झाडे प्राणी पक्षी व इतर जैव विविधते बाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव वळंजू यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले.
यावेळी आशिष पेडणेकर, डॉक्टर कमलेश चव्हाण, दिशा पोयेकर, ओमकार ऐरेकर, डॉ गणेश मर्गज, कविता तळेकर, दिनेश ऐरेकर, राजन तांबे, दर्शन वेंगुर्लेकर, चिन्म या चव्हाण , गौतमी कांदळकर , रुद्राक्ष कांदळकर, संचीता कांदळकर , स्वाती पारकर , नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य मांजरेकर उपस्थित होते.
The Blue Wings युवा मंडळ यापुढेही अशा तऱ्हेचे उपक्रम आयोजित करेल व युवकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव वळंजू यांनी दिले व उपस्थितांचे आभार मानले.
युवकांकडून राष्ट्र निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने नेहरू युवा केंद्र युवकांसाठी विविध उपक्रम राबवते. चांगल्या नागरिकत्वाची मूल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो म्हणजेच सामाजिक बांधिलकी युवकांमध्ये रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन होत असते . या कार्यात सहभागी होण्यासाठी मालवण तालुक्यातील 15 ते 29 वयोगटातील युवकांनी नेहरू युवा केंद्राशी आपली मंडळे संलग्न करून युवकांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य मांजरेकर यांनी केले आहे .
या कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी व नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक अपेक्षा मांजरेकर, स्वाती पारकर, विशेष सहकार्य लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)