ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न..!

प्रकाशन: 15 Aug 2022 08:54 PM
वाचन संख्या 64

चिंदर | विवेक परब :
ग्रामपंचायत कार्यालय पळसंब येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण पार पडले. जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत भव्य प्रभातफेरी, शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्रसेनानीची मुलाखत, रंगभरण स्पर्धा, समूहागीतगायन, मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर प्राथमिक उपकेंद्र त्रिंबक पळसंब यांचे उद्बोधन शालेय विद्यार्थी आणि माता पालक यांची आरोग्य तपासणी, परिसर स्वच्छता, व्यसनमुक्ती मार्गदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामसेवक अमित कांबळी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच रमेश परब यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच सुहास सावंत, अरूण माने,ग्रा.पं.सदस्य,श्रीम.उज्वला परब, श्रीम.प्रणिता पुजारे, श्रीम.सीमा चव्हाण, रविकांत सावंत शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, रमेश मुणगेकर उपाध्यक्ष शालेय शिक्षण समिती, शिक्षण प्रेमी अमरेश पुजारे, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब चे मुख्याध्यापक असरोंडकर, सौ.पवार मॅडम, ग्रामसेवक अमित कांबळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष उल्हास सावंत, रमेश परब, सुरेश लाड बचत गट महिला सदस्य उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स