गणेश उत्सव काळात वाहतूक व्यवस्था व सुरक्षा बंदोबस्तासाठी बांदा पोलीस निरीक्षकांकडे निवेदन..!
बांदा | राकेश परब :
भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या वतीने आगामी येणाऱ्या गणेश उत्सव काळात दरवर्षी प्रमाणे ठेवण्यात येणारी सुयोग्य वाहतूक व्यवस्था आणि चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच बांदा हे शहर असल्यामुळे अनेक आजुबाजुच्या गावातील कुटुंब इथे राहतात. उत्सव काळात त्याची घरे बंद असतात त्यावेळी रात्रीच्या वेळी घरफोडी च्या घटना घडू शकतात त्यासाठी रात्रीचे पेट्रोलिंग मधे वाढ करावी. काही नियोजनात आपल्याला जनतेकडून सहकार्य अपेक्षित असल्यास त्याबाबतची जनजागृति करण्यास आम्ही तयार आहोत असे निवेदनात म्हटले आहे.
अनेक उत्सव ,सर्वपक्षीय कार्यक्रम, मिरवणुका, बंद या काळात आपली आणि आपल्या ठाण्याची भूमिका अतिशय शिस्तबद्द, मोलाची आणि सहकार्य ची राहिली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी ,बांदा शहर वतीने त्यांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित बांदा सह शहराध्यक्ष बाबा काणेकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्वेता कोरगावकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका नाईक, बांदा मंडल सचिव रुपाली शिरसाट, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बांदा मंडल उपाध्यक्ष सिद्धेश पावसकर, बांदा शहर युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, नितेश पेडणेकर, तनुजा वराडकर, सुनील राऊळ, आबा धारगळकर, सर्वेश काणेकर, यतीन धामापूरकर, संतोष सावंत, सुनील धामापूरकर.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)