<em>रामेश्वर वि.का.स सोसायटीत चिंदर येथे शेतकरी सभासदाच्या हस्ते ध्वजारोहण…!</em>
चिंदर | विवेक परब :
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंदर येथील श्री रामेश्वर वि.का.स से. सोसायटी मध्ये १३ ऑगस्टला माजी सैनिकांच्या विधवा पत्नी प्रिया भानजी पालकर यांच्या हस्ते, १४ ऑगस्टला सुलोचना नाटेकर यांनी तर आज १५ ऑगस्टला गावातील शेतकरी आणि सोसायटी सभासद सत्यवान मुणगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, व्हाईस चेअरमन सुनिल पवार, सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी कार्यकारी सदस्य दिंगबर जाधव, विश्वास खरात, विवेक परब, सोसायटी सचिव कविंद्र माळगांवकर, बाबा हडपी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, शशीकांत नाटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, श्रृती गांवकर, निशीगंधा वझे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, दत्तात्रय लाड, बुटे, आप्पा गावडे, पोलिस पाटील दिनेश पाताडे, शंकर पालकर, अनंत तोरसोळकर, आरोग्य सेवक गोसावी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी, बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)