<em>प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवणच्या वतीने ओरोस येथे होमगार्ड बांधवांना रक्षाबंधन…!</em>
ओरोस | प्रतिनिधी :
१४ऑगस्टला जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी मालवण यांच्या वतीने होमगार्ड ना रक्षाबंधन करण्यात आले.
शिक्षक भारती संघटना वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते,त्यापैकी महिला आघाडीचा हा उपक्रम समादेशक होमगार्ड कार्यालय येथे संपन्न झाला.दरवर्षी समाजातील प्रसिद्धी पासून दूर पण महत्वपूर्ण सेवा पुरविणाऱ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालवण महिला आघाडी ‘रक्षाबंधन’ हा उपक्रम आयोजित करत असते. यातून सेवाभाव वाढविणे व समाजाला या घटकांच्या कार्याचं महत्व पटवून देणं हा उद्देश आहे. होमगार्ड पथक हे राज्यभरात समाजासाठी भरीव कार्य करते.कोरोना काळातसुद्धा,आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या खांद्याला खांदा लावून जीवाची बाजी लावून काम केले.शासनाकडून अपेक्षित व समाजाकडून बेदखल अशा होमगार्ड बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचे कार्य प्रकाशझोतात आणणे हा उद्देश ठेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी मालवणच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ओरोस येथील जिल्हा समादेशक व होमगार्ड कार्यालयात जवळपास ५० होमगार्डस बंधूंना शिक्षक भारतीच्या भगिनींनी ओवाळणी करून राख्या बांधल्या. तसेच सर्वांना मिठाई व उपयुक्त भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी अधीक्षक श्री सुर्वे यांनी शिक्षक भारती च्या या उपक्रमाचे कौतुक केले.व होमगार्डच्या कार्याची दखल घेवून होमगार्डसची रक्षबांधनसाठी निवड केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी जिल्हा महिला आघाडी सचिव श्रीम वैशाली गर्कळ,तालुका महिला आघाडी अध्यक्ष शितल परुळेकर,सचिव सेजल परब,सरिता नाईक,विजयालक्ष्मी डगरे,स्मिता गावडे,वैशाली साठे, पुजा शिरोडकर,स्नेहल बेलसरे, प्राजक्ता कनयाळकर, मिलन जाधव,स्वरा शिंदे,लीना भंडलकर,आदी महिला सदस्या तसेच जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, जिल्हा पदाधिकारी श्री.सिद्धार्थ नेरुरकर, श्री कृष्ण कालकुंद्रीकर,श्री दिनकर शिरवलकर, जाधव,तुकाराम खिल्लारे,विठ्ठल शिंदे तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)