गाय सेंद्रिय शेतीचा केंद्र बिंदू - सुरेश मापारी प्रगतशील शेतकरी.
चिंदर ग्रामपंचायत आयोजित कृषी मेळावा…!
चिंदर | विवेक परब :
अमृत महोत्सवा निमित्त चिंदर ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
वेरली येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एका गाईमुळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो, देशी गाय व जर्सी गाय यातील फरक, सामुदायिक शेतीचे फायदे, गोमूत्राचे फायदे, देशी गाईच्या दुधाचे फायदे, जीवामृत कसे बनवले जाते. जमिनीचा कस कसा वाढवला जातो. आपण करत असलेल्या कलिगंड, शेवग्यांची तसेच अन्य पिकांची केलेली लागवड याबाबत अनुभव तसेच आपण निष्ठा, नियोजन, निधी, निसर्गाची साथ यांची जोड केल्यास शेती व्यवसायात हमखास यशस्वी होतो म्हणून आपणही सेंद्रिय शेतीकडे वळा असे प्रतिपादन मापारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
ग्रामपंचायत परिसरात मापारी यांच्या हस्ते यावेळी वृक्ष लागवडही करण्यात आली.यावेळी सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, कृषी सहाय्यक सुनिल कदम, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, कृषी मित्र-जयवंत(भाई) तावडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर. शशिकांत नाटेकर, प्रिया पालकर, भूषण पाताडे, प्रभाकर गुडेकर, गुडाकर गुरुजी, चिंदरकर, खोत, वाक्कर, विनायक मसुरकर, विश्राम माळगांवकर, आबा पवार उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)