ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला..!

प्रकाशन: 14 Aug 2022 08:46 PM
वाचन संख्या 46

शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन…!

मुंबई | ब्यूरो न्यूज : मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून सर्वसामान्यांना देखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली.

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते , त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे.विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी अकासा एअर ही विमान सेवाही सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स