ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर…!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर…!</em>

प्रकाशन: 14 Aug 2022 08:38 PM
वाचन संख्या 38

मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत :

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील –
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास.

सुधीर मुनगंटीवार-
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.

चंद्रकांत पाटील-
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.

डॉ. विजयकुमार गावित-
आदिवासी विकास.

गिरीष महाजन-
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण .

गुलाबराव पाटील-
पाणीपुरवठा व स्वच्छता .

दादा भुसे-
बंदरे व खनिकर्म .

संजय राठोड-
अन्न व औषध प्रशासन.

सुरेश खाडे-
कामगार

संदीपान भुमरे-
रोजगार हमी योजना व फलोत्पादन.

उदय सामंत-
उद्योग

प्रा.तानाजी सावंत-
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण .

रवींद्र चव्हाण –
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

अब्दुल सत्तार-
कृषी

दीपक केसरकर-
शालेय शिक्षण व मराठी भाषा.

अतुल सावे-
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण.

शंभूराज देसाई-
राज्य उत्पादन शुल्क.

मंगलप्रभात लोढा-
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स