ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>गोळवण ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>गोळवण ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा..!</em>

प्रकाशन: 14 Aug 2022 07:52 PM
वाचन संख्या 81

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देशाच्या अमृत महोत्सव मंगलमय कार्यकाळात मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीने महाआवास अभियान २०२१/२२ ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गोळवण ग्रामपंचायतीने या योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सरपंच सुभाष लाड व सहकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जि. प. सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा समारंभ होणार आहे.

गोळवण ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत द्वितीय क्रमांक कणकवली तालुक्यातील बोर्डवे ग्रामपंचायत तर तृतीय क्रमांक मालवण तालुक्यातील राठीवडे ग्रामपंचायतला जाहीर झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत प्रथम वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ तर द्वितीय मालवण तालुक्यातील खरारे पेंडुर, तृतीय क्रमांक देवगड तालुक्यातील मीठमुंबरी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स