ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>मडूरा, रोणापाल, पाडलोस शाळामंध्ये कोकण कला व शिक्षण संस्थेच्या वतीने शालेय दप्तर संच वाटप..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>मडूरा, रोणापाल, पाडलोस शाळामंध्ये कोकण कला व शिक्षण संस्थेच्या वतीने शालेय दप्तर संच वाटप..!</em>

प्रकाशन: 14 Aug 2022 04:44 PM
वाचन संख्या 42

बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेकडो गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात येते. त्यात सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, ठाणे, पुणे अशा अनेक जिल्ह्यात यावर्षीसुद्धा शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. शाळा मडूरा, जि. प. शाळा पाडलोस, जि. प. शाळा रोणापाल शाळांना आज दप्तर वाटप करण्यात आली.

खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे हे ओळखून दरवर्षी संस्था शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शालेय दप्तर तसेच स्कॉलरशिपचे वाटप करते. आज येथे शालेय दप्तर संच वाटप केल्याबद्दल रोणापाल गावचे सरपंच सुरेश गावडे यांनी आभार मानले.

यावेळी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, सुरेश गावडे, प्रथमेश सावंत, देव कुबल, निर्जरा परब यांनी सहभाग घेतला. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स