ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आडवली ग्रामपंचायतच्या वतीने भरगच्च कार्यक्रम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आडवली ग्रामपंचायतच्या वतीने भरगच्च कार्यक्रम..!

प्रकाशन: 14 Aug 2022 03:58 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्रतिनिधी :
ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत मार्फत घरोघरी ध्वज वितरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत इमारतीला विद्युत रोषणाई तसेच तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.13 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचा मान सरपंच यांनी महिला उपसरपंच सौ .सोनाली पराडकर यांना दिला. तसेच दिनांक 14 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचे अधिकार गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. संजय मारुती घाडीगावकर व श्री सनीत सुधाकर पराडकर यांना देऊन वेगळा आदर्श सरपंच आडवली मालडी यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.14 ऑगस्टला गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये शाळा, अंगणवाडी सर्व शासकीय कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. 15 ऑगस्टला ग्रामपंचायत जवळ ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून त्यामध्ये सर्व शाळा अंगणवाडी सहभागी होऊन चित्ररथ सहभागी होणार आहेत. 16 ऑगस्टला कृषी आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत मानवी साखळी द्वारे आडवली तीठा येथे करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच,सर्व सदस्य ,गाव स्तरावरील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्ग, गाव स्तरावरील सर्व आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक ,महिला बचत गट, महिला मंडळ ,भजन मंडळे युवक मंडळे, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,ग्रामपंचायत कर्मचारी, रिक्षा संघटना, वर्ग ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स