<em>स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पळसंब येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण..!</em>
चिंदर | विवेक परब :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कार्यालय पळसंब येथे श्रीम.अनुजा नारायण राऊत यांच्या हस्ते तर जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा येथे पळसंब गावचे माजी स्वातंत्रसैनिक श्री.रामचंद्र सिदु वरक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पळसंब ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत, ग्रा.पंचायत सदस्य अरुण माने, शालेय समिती अध्यक्ष रविकांत सावंत, शिक्षण प्रेमी, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, मुख्याध्यापक श्रीम.मानसी असरोंडकर, पवार मॅडम, प्रसाद वरक तसेच माता पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)