ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे गावचे सुपुत्र विष्णू उर्फ सुरेश परब यांची ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे गावचे सुपुत्र विष्णू उर्फ सुरेश परब यांची ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती…!

प्रकाशन: 13 Aug 2022 10:04 AM
वाचन संख्या 109

विष्णू परब हे राष्ट्रीय शूटिंग बॉल खेळाडू ; मसुरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा..

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे गडघेरा वाडीचे सुपुत्र विष्णू उर्फ सुरेश दत्ताराम परब यांची मुंबई ठाणे येथे नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. विष्णू हे ठाणे पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असून आपल्या पोलीस दलातील ३१ वर्ष चार महिने सेवा पूर्ण केली आहे. विष्णू परब यांच्या या निवडीबद्दल मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.

विष्णू उर्फ सुरेश परब हे मसुरे गडघेरा वाडीचे सुपुत्र असून लहानपणापासूनच सर्व क्षेत्रात ते नेहमी पुढे असायचे. मसुरे येथील होल मसुरे, सिक्स फायटर शूटिंग बॉल संघाचे प्रतिनिधित्व करता करता ठाणे जिल्हा ते महाराष्ट्र शूटिंग बोल संघाचे सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. देशपातळीवरतीही आपल्या शूटिंग बॉल खेळाने त्याने मसुरे गावाचे नाव उज्वल केले होते. पोलीस दलातील अनेक गौरवास्पद कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. यावेळी बोलताना विष्णू परब म्हणालेत यापुढेही आपल्या भूमीचे आणि पोलीस दलाची शान राखून आपण कार्य करणार असून, सर्व सामान्यांना न्याय मिळवून देऊन पोलीस दलाची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या निवडी बद्दल उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळा गोसावी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, सौ सरोज परब, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंट्या गावकर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष डॉ साठे, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, छोटू ठाकूर, शूटिंगबॉल खेळाडू प्रदीप पाटकर, सुनील प्रभूगावकर, शिवाजी परब, बबन राणे, हनुमंत प्रभू, हिरबा तोंडवळकर, प्रमोद बागवे, श्री लक्ष्मण शिंगरे ,बाळू दळवी, अवधूत चव्हाण, शैलेश मसुरकर, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे. येत्या गणेश उत्सवात विष्णू परब हे गावी येणार असून होल मसुरा शूटिंग बोल संघ आणि मसुरे ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स