व्ही.एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडिअम स्कूलला बाबा काणेकर व आबा धारगळकर यांच्या कडून बायोमेट्रिक मशीन प्रदान.
बांदा | राकेश परब : मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही.एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडिअम स्कूल, बांदा या प्रशाळेला येथीलच युवा उद्योजक तथा भाजपा बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर,तसेच युवा व्यापारी आणि भाजपा बांदा मंडल सदस्य आबा धारगळकर यांच्या कडून बायोमेट्रिक मशीन भेट स्वरूपात देण्यात आली.
व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडिअम स्कूल ला कार्यालयीन कामाकाजासाठी या बायोमेट्रिक मशीन ची आवश्यकता होती. यासंदर्भात बाबा काणेकर व आबा धारगळकर यांनी शाळेची गरज ओळखुण स्वतः च्या खर्चाने सदर मशीन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांच्या कडे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित देण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर, हेलन राॅड्रिक्स, रसिका वाटवे, पुजा सावळ, जितेंद्र नाईक, सुप्रिया पाटील,भिकाजी गिरप,अनिषा राॅड्रिक्स, चित्रलेखा नाईक,राकेश परब,उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)