ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विविध कलागुण जोपासणाऱ्या शिक्षकांचा अभिमान : जे. पी. डांगे
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विविध कलागुण जोपासणाऱ्या शिक्षकांचा अभिमान : जे. पी. डांगे

प्रकाशन: 11 Aug 2022 08:31 AM
वाचन संख्या 63

मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक व शिक्षक बाबू घाडीगांवकर यांची केली प्रशंसा…

विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे पवित्र कार्य जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करीत आहेत. शिक्षकी पेशा प्रामाणिकपणे करीत असतानाच विविध कलागुण जोपासणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रवेश व नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी दापोली येथील एका अनौपचारिक कार्यक्रमात बोलताना काढले.
दापोली तालुक्यातील चंद्रनगर शाळेत विषय शिक्षक म्हणून काम करीत असलेले बाबू घाडीगांवकर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध भाषिक व गुणवत्तापूर्ण उपक्रम अविरत राबवित आहेत. शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावीत असतानाच ते विविध नियतकालिकांतून, दैनिकांतून ललितलेखन व काव्यलेखन करीत आहेत. त्यांचा ‘ बाबा ‘ हा कवितासंग्रह व ‘ वणवा ‘ हा लघुकथासंग्रह मला आताच सप्रेम भेट स्वरुपात मिळाला आहे. अशा प्रकारे विविध कलागुण जोपासणाऱ्या शिक्षकांचा मला अभिमान वाटतो असे जे.पी. डांगे यावेळी म्हणाले.
यावेळी दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली पंचायत समिती राबवित असलेल्या ‘ व्हिजन दापोली ‘ या तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणाऱ्या व प्राथमिक शाळेतील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती जे.पी. डांगे यांना दिली. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ‘ व्हिजन दापोली ‘ नावाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असल्याची माहिती मला आता मिळाली आहे. या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा व स्पर्धांचे नियमितपणाने आयोजन करण्यात येत असल्याचेही माझ्या वाचनात आले आहे. या उपक्रमाचे फलित म्हणून शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. ही खरोखरच प्रशंसनीय व गौरवास्पद बाब आहे. येथील ‘ व्हिजन दापोली ‘ उपक्रमाचा प्रसार व प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते असेही जे.पी. डांगे यावेळी म्हणाले. यावेळी जे. पी. डांगे यांचेसोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा नियामक प्राधिकरणाचे कक्ष अधिकारी एस. के. कविठकर, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव उपस्थित होते. यावेळी बाबू घाडीगांवकर यांनी त्यांनी लिहीलेली ‘ बाबा ‘ व ‘ वणवा ‘ ही दोन पुस्तके त्यांना सप्रेम भेट स्वरुपात दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स