ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली मसुरे-डांगमोडे वस्तीची एसटी फेरी त्वरित चालू न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : लक्ष्मी पेडणेकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली मसुरे-डांगमोडे वस्तीची एसटी फेरी त्वरित चालू न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : लक्ष्मी पेडणेकर.

प्रकाशन: 10 Aug 2022 03:01 PM
वाचन संख्या 62

मसुरे | प्रतिनिधी : कणकवली एसटी आगारातून संध्याकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी मालवण एसटी आगाराची कणकवली मसुरे डांगमोडे ही वस्तीची फेरी गेले कित्येक महिने बंद केल्यामुळे येथील विद्यार्थी वर्गासहित व्यापारी ज्येष्ठ ग्रामस्थ आणि सर्व प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ही बस फेरी येत्या चार दिवसात सुरू न केल्यास मसुरे बाजारपेठ येथे आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे.

गेली कित्येक वर्षे मालवण आगारात ची कणकवली मसुरे डांगमोडे ही एसटी बस फेरी संध्याकाळी सव्वा पाच वाजता कणकवली एसटी आगारातून सुटून डागमोडे येथे वस्तीला येते होती. पुन्हा हीच एसटी सकाळी सात वाजता डांगमोडे मसुरे कणकवली अशी परत जात होती. परंतु एसटी प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक ही बस बंद केल्याने येथील एसटी प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. डांगमोडे या भागातून संध्याकाळी एकही बस नसल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर येथील ग्रामस्थांना रात्र प्रसंगी पायी प्रवास करावा लागत आहे. येथील लहान-मोठे व्यापारी महिला ग्रामस्थ सकाळी याच एसटीने डांगमोडे ते मसुरे बाजाराला येत असतात आणि छोटा छोटा व्यापार करत असतात.आता ही फेरी नसल्यामुळे या सर्वांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच सकाळी शालेय विद्यार्थी कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. एसटी प्रशासनाने ही फेरी त्वरित चालू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मसुरे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर यांनी एस टी प्रशासनाला दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स