ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आजी माजी स्वातंत्र्य सैनिक, सर्व माजी सरपंच तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

आजी माजी स्वातंत्र्य सैनिक, सर्व माजी सरपंच तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

प्रकाशन: 10 Aug 2022 11:45 AM
वाचन संख्या 44

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्रामपंचायत खरारे पेंडूर येथे सत्कार समारंभ संपन्न…

चौके | अमोल गोसावी :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत खरारे पेंडूर कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचं पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी गावातील सर्व आजी माजी सैनिक, सर्व माजी सरपंच, तसेच गावातील विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सर्व सत्कार मूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने देखील सैनिकांचे स्मरण यानिमित्ताने कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक सुशील राणे यांनी मनोगत व्यक्त करताना गावात अशा पद्धतीने कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे सांगितले. पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी त्यागाच्या भावनेतून आपले भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावे जनेकरून एक चांगले उज्वल भविष्य मुलांना येत्या काळात प्राप्त होईल..तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाचे देखील त्यांनी कौतुक केले. अशा प्रकारे गावात पहिल्यांदाच गावातील सर्व माजी सरपंच यांचा सत्कार करण्याचे आपल्या ग्रामपंचायतीने आयोजिले हे खरोखरच कौतुकाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगत समाधान व्यक्त केले.. त्याच बरोबर माजी सैनिक श्री हेमंत कनियाळकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले सैन्यात देशसेवेसाठी आपल्या मुलांना पाठवून त्यागाची भावना जपणाऱ्या मातेच्या त्यागाविषयी त्यांनी जाणीव करून दिली. तसेच मंडळ अधिकारी उमेश राठोड यांनी पुढे मार्गदर्शन करताना मालवण तालुक्यातील उल्लेखनीय असा कार्यक्रम आज आपल्या ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविल्या बद्दल कौतुक देखील केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्या वैष्णवी लाड यांनी केले.
यावेळी सरपंच सुनिता मोरजकर, उपसरपंच विवेक जबडे, सोसायटी अध्यक्ष दिलीप सावंत, पोलीस पाटील विश्वास मालवणकर, मंडळ अधिकारी उमेश राठोड, कृषी सेवक गीते, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कुलकर्णी, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शिवराम सावंत,ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था अक्ष्यक्ष, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स