जिल्ह्यातील दुधउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा..!
१० ऑगस्ट रोजी अभिषेक मंगल कार्यालय,कासार्डे तिट्टा येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन…!
संतोष साळसकर / ब्युरोचीफ :
गोकुळ दुध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.बँक यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुधउत्पादक शेतकऱ्यांसाठी बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी अभिषेक मंगल कार्यालय,कासार्डे तिठा येथे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ९.३० वा.पासुन दिवसभर चालना-या या प्रशिक्षणात जातीवंत दुधाळ जनावरांचे महत्त्व , जनावरांच्या चा-याचे नियोजन , गोठ्यातील व्यवस्थापन , गाभण तक्रार व माज ओळखणे , लसिकरनाचे महत्त्व , जंतनिर्मुलन , वासरे संगोपन आदि विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी मार्गदर्शक म्हणून किल्लेदार डेअरी फार्म तिटवेचे संचालक सागर किल्लेदार व सौ.वंदना किल्लेदार हे मार्गदर्शन करणार आहेत. ते दोघेही उच्च शिक्षित असुन यशस्वी दुधउत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांचेकडे सध्या पन्नासच्यावरती लहान मोठ्या गाई-म्हैशी आहेत.
किल्लेदार दांपत्याने आजवर महाराष्ट्रातील लाखाच्यावरती दुधउत्पादक शेतक-यांना प्रशिक्षण दिले आहे. तरी या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)