पळसंब ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम प्रणाली सुरू आहे. आज पळसंब ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा या ठिकाणी सकाळी 11.00 वाजता राष्ट्रगीत चे गायन केले गेले.
यावेळी पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत, ग्रामपंचायत सदस्य उज्वला परब, प्रणिता परब, ग्रामसेवक अमित कांबळी, कृषिसहाय्यक अश्विनकुमार कुरकुटे, अंगणवाडी सेविका दिया आनंद चिंदरकर, निकिता पुजारे, सुनेत्रा परब, अंजली गोलतकर, पल्लवी सावंत, सुरेश लाड, कृष्णा सावंत, आपकर तसेच अंगणवाडीतील मुलांनी पण उपस्थिती दर्शविली. ग्रामसेवक यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)