लायन्स क्लब ऑफ मालवणचा समूह राष्ट्रगान उपक्रमाला नियोजनबद्ध प्रतिसाद.
दैवज्ञ भवन पटांगणावर जमून गायले समूह राष्ट्रगान.
मालवण | सुयोग पंडित :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मालवण नगरपालिकेने आज मंगळवारी आयोजित केलेल्या समूह राष्ट्रगान कार्यक्रमात लायन्स क्लब मालवणने नियोजनबद्ध सहभाग घेतला.
मालवण लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी मालवण मेढा येथील दैवज्ञ भवनच्या पटांगणात एकत्र जमून सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीत म्हणत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाला लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, सौ. मीना घुर्ये, सौ. नीलम मयेकर, सौ. पल्लवी खानोलकर, महेश अंधारी, विराज आचरेकर, राजा शंकरदास, महेश कारेकर, अरविंद सराफ, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर, सौ. कल्पना सारंग, सौ. दिव्या कोचरेकर, सौ. हिमानी गायकवाड, सौ. मालती काळे आदी सहभागी झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)