ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघ होणार स्थापन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघ होणार स्थापन..!

प्रकाशन: 09 Aug 2022 03:51 PM
वाचन संख्या 81

१५ ऑगस्टला किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने करणार कार्यकारणी जाहीर ; पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांची घोषणा.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक यांना एकत्र करून सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने महासंघाची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. अशी माहिती पर्यटन उद्योजन दामोदर तोडणकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून दिली आहे.

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी व खाडी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसायिक व पर्यटन व्यावसायिक यांनी मोठ्या मेहनतीने पर्यटन व्यवसाय उभे केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत या सर्व व्यवसायिकांचे महत्वाचे योगदान आहे. मात्र शासन स्तरावरील प्रश्न असो अथवा अन्य समस्या असो नेहमीच या व्यवसायिकांना संघर्ष करावा लागला. तरी पर्यटन व्यावसायिकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांची स्वतःची हक्काची संघटना असावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अनेक पर्यटन व्यवसायिक यांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक यांची एकत्रित बैठका तसेच व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेऊन एकमताने महासंघाची कार्यकारणी निश्चित केली जाणार आहे. अशी माहिती दामोदर तोडणकर यांनी दिली आहे.

टूर्स व्यवसायिकांनाही सॊबत घेणार…

पर्यटन व्यवसायात टूर्स व्यवसायिकांचे महत्वाचे स्थान आहे. या दृष्टने कार, रिक्षा व अन्य वाहने जी पर्यटन सफर घडवतील यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स यासाठी येणारे पर्यटक जिल्ह्याची पर्यटन सफर करतील. त्या पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांची पॅकेज निश्चिती करावी. या साठी टूर्स व्यवसायीकांना सोबत घेऊन महासंघ काम करणार आहे. आपण सगळे एक आहोत. या भावनेतून एकत्र येऊया. असे आवाहन दामोदर तोडणकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स