मसूरे येथील प्रतिष्ठित व्यापारी देविदास शिरसाट यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे बाजारपेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते देविदास भास्कर शिरसाट वय ५७ वर्ष यांचे शनिवारी संध्याकाळी उशिरा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
रविवारी सकाळी मसुरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देविदास शिरसाट यांच्या निधनाने मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.
देविदास हे मसूरे येथे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. गावातील सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते सर्वांशी ते आदराने आणि प्रेमाने वागत असल्यामुळे सर्वांशी त्यांची मैत्री होती. देविदास यांच्या निधनामुळे मसूरे येथील व्यापार क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय,आई, बहीण, भाओजी, पुतणे, पुतणी, भाचे,भाची, नातवंडे असा मोठा परिवार आहे मसुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ शिरसाट,तसेच प्रतिष्ठित व्यापारी भाऊ शिरसाट, आपा शिरसाट यांचे ते बंधू तर कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अंधारी यांचे ते मेहुणे होतं.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)