<em>माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पेंडूर गावासाठी कंत्राटी वीज कर्मचारी दीपक वायंगणकर यांची नियुक्ती ….!</em>
माजी चेअरमन श्री सतीश पाटिल यांनी केला होता पाठपुरावा..
चिंदर | विवेक परब :
गेली अनेक वर्षे पेंडूर गावात एकच कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत होता. गावाची भौगोलिक रचना मोठी असल्याने एकच कर्मचारी लोकांना सेवा योग्य रीतीने देऊ शकत नव्हता. यासाठी गेले अनेक महिने माजी चेअरमन श्री सतीश पाटिल हे संबंधित खात्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत होते. गावातील ही समस्या सुटावी यासाठी प्रयत्न करत होते.
हा कर्मचारी उपलब्ध व्हावा यासाठी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी आपल्या माध्यमातून गावाची ही मागणी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली होती याच पार्श्वभूमीवर आज विज वितरण ठेकेदार कंपनी मार्फत प्राप्त झालेले पत्र दिपक वायंगणकर यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संजू परब, महेश मांजरेकर, गणेश कुशे, पुजा करलकर, दादा साईल, दादा नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते…
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)