पळसंब येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन….!
चिंदर | विवेक परब :
पळसंब येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या डेमो हाऊसचा उद्घाटन सोहळा जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन ) राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समिती मालवणचे गटविकास अधिकारी (उच्चस्तर वर्ग गुजर ),पंचायत समिती विस्तार अधिकारी पी.डी.जाधव, कृषी विस्तार अधिकारी गोसावी,व्ही.के.जाधव, कृषी सहाय्यक कुरकुटे, पंचायत समिती बांधकाम विभाग जि.प.उपविभागचे शाखा अभियंता मगर, कात्रे रावसाहेब,आडवली चे ग्रामसेवक युवराज चव्हाण, सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत, सदस्य अरुण माने यांच्या उपस्थित पार पाडला. ग्रामसेवक अमित कांबळी यांनी स्वागत व सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)