कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे युवा महोत्सव मयूर पंख २०२२ चे आयोजन…!
वैभववाडी / नवलराज काळे :
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव मयूर पंख http://localhost/news/public/uploads/2022 आयोजन 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट2022 या कालावधी श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी तालुका वैभववाडी येथे युवा महोत्सव मयूर पंख http://localhost/news/public/uploads/2022 आयोजन करण्यात आले आहे.
या युवा महोत्सव मयूर पंख http://localhost/news/public/uploads/2022 या होणाऱ्या महोत्सवात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत 28 कृषी महाविद्यालय व 28 महाविद्यालयातून 800 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महोत्सवात स्पर्धा म्हणून शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, समूह गायन, ताल वाद्य, सूर वाद्य, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, प्रश्नमंजुषा, नक्कल, मुखभिनव, चित्रकला, व्यंगचित्र, रांगोळी, व छायाचित्रे अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी माहिती सांगुळवाडी येथील मध्यवर्ती सभागृहात संपन्न होणार असून या कार्यक्रमास कार्यक्रमाध्यक्ष संदीप पाटील संचालक, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .पी .सी हळदवणेकर सहयोगी अधिष्ठाता उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे, विशेष उपस्थिती डॉ. व्ही जी नाईक संचालक क्रीडा व सह शैक्षणिक उपक्रम डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, प्रसाद कुलकर्णी सुप्रसिद्ध कवी आणि व्याख्याते, एन .ए शिरसाट विद्यापीठ सांस्कृतिक विभाग, एन .ए वागळे विद्यार्थी कल्याण अधिकारी विद्यापीठ दापोली,एस आर येवले संस्था सचिव, डॉ डी बी पाटील प्राचार्य आदी उपस्थित रहाणार आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)