ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'मसूरे येथे वाचन संस्कृती अभियान'..!!

'मसूरे येथे वाचन संस्कृती अभियान'..!!

प्रकाशन: 31 Jul 2022 05:28 PM
वाचन संख्या 50

कोमसाप-कथामाला, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन..!!

मसुरे | प्रतिनिधी :
मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सकस वाचन संस्कृती वाढीला लागावी म्हणून अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण आणि कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रम सन्मेष मसुरेकर, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मसुरे नं.1 यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला व कोमसाप मालवण, सदानंद कांबळी (बाल साहित्यिक), शर्वरी सावंत (मुख्याध्यापिका), शिवराज सावंत (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक), गुरुनाथ ताम्हणकर (कथामाला संपर्कप्रमुख) उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने पालक वर्गाला ललित मासिकाचे अंक, विद्यार्थी वर्गाला कल्पना मलये लिखित ‘कारटो’ या पुस्तकाचे वितरण तसेच विद्यार्थ्यांना साधनाचे बालकुमार अंक भेट देण्यात आले.
वाचनाचे महत्त्व बालक, पालक आणि शिक्षकांना पटवून देताना सुरेश ठाकूर म्हणाले, “ह्या मोबाईलच्या युगात वाचनाचा छंद सर्वांनी जपावा. वाचनामुळे विचारांना स्पष्टता येते. भाषेला वळण प्राप्त होते. अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढते. विचारांचे संक्रमण होते आणि सर्वांचे व्यक्तिमत्व समृद्ध होते. म्हणून सकस साहित्य वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. विनोद सातार्डेकर, श्री. गोपाळ गावडे, सौ. रामेश्वरी मगर, (सर्व शिक्षक मसुरे नं. 1), सौ. सुखदा मेहेंदळे, श्री. सुहास गावकर (मसुरे कावा), श्री. प्रशांत पारकर, श्री. सचिन डोळस, सौ. स्वाती कोपरकर, कविता सापळे (मसुरे देऊळवाडा), सौ. शुभदा रेडकर, श्री. राजेंद्र धारपवार, श्री. उदय कदम, सौ. पूर्वा केळूसकर (वेरली) सौ. श्रद्धा वाळके, सौ. अक्षता कोरगावकर (मसुरे भोगलेवाडी) आदी शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, लक्ष्मी पेडणेकर, मयुरी शिंगरे, दीप्ती पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यापूर्वी पुस्तक दिनाचे औचित्य साधून आचरे प्रभागात ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथदान सोहळा साजरा झाला होता. मसुरे प्रभागाच्या या वाचन संस्कृती सोहळ्याचे आभार प्रदर्शन विनोद सातार्डेकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स