ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
" साने गुरुजी कथामाला बिनभिंतीची बिन घंटीची शाळा": सुरेश ठाकूर, अध्यक्ष - साने गुरुजी कथामाला मालवण.

" साने गुरुजी कथामाला बिनभिंतीची बिन घंटीची शाळा": सुरेश ठाकूर, अध्यक्ष - साने गुरुजी कथामाला मालवण.

प्रकाशन: 31 Jul 2022 05:22 PM
वाचन संख्या 87

मसुरे | प्रतिनिधी :
‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ही बिनभिंतीची आणि बिन घंटी ची शाळा आहे,’ असा कथामालेचा गौरव ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रजांपासून ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत अनेक जणांनी केलेला आहे. “ती कथामाला भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गावागावात, घराघरात पोहोचली पाहिजे. तिच खरी कथामाला संस्थापक प्रकाश भाई मोहाडीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे उद्गार सुरेश ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांनी कथामाला संपर्क यात्रा मसुरे- मालवण प्रभाग येथील दौऱ्यात काढले.
साने गुरुजी कथामाला, मालवण या संस्थेच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संगमावर मालवण शाखेने शाळाभेट संपर्क अभियान राबवले आहे. मालवण शाखेतील जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचून त्यांना कथेचे अभ्यासक्रमातील महत्त्व, कथांचे प्रकार आदी समजावून देणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकता, एकात्मता, बंधुता, देशप्रेम, राष्ट्रप्रेम आदी मूल्ये कथामालेच्या माध्यमातून कशी रुजवता येतात, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन शाळेत जाऊन करण्यात येते.
मसुरे प्रभाग कथामाला संपर्क अभियानात त्यांचे सोबत सदानंद मनोहर कांबळी, सल्लागार समिती सदस्य, कथामाला, गुरुनाथ ताम्हणकर- संपर्कप्रमुख मसुरे प्रभाग हे सहभागी झाले होते. या संपर्क अभियानात यावेळी केंद्र शाळा मसुरे नं.1, प्राथमिक शाळा मसुरे कावा, प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा, प्राथमिक शाळा वेरली, प्राथमिक शाळा मसुरे भोगलेवाडी या शाळेत जाऊन बालक, पालक आणि शिक्षक वर्गाशी कथा, गाणी, गोष्टी यांच्यामार्फत संपर्क साधला. शाळेतील मुलांनी कथाकथन, गीतगायन, पोवाडा गायन केले.
या संपर्क यात्रेत सौ. शर्वरी सावंत, श्री. विनोद सातार्डेकर, श्री. गोपाळ गावडे, सौ. रामेश्वरी मगर, (सर्व शिक्षक मसुरे नं. 1), सौ. सुखदा मेहेंदळे, श्री. सुहास गावकर (मसुरे कावा), श्री. प्रशांत पारकर, श्री. सचिन डोळस, सौ. स्वाती कोपरकर, कविता सापळे (मसुरे देऊळवाडा), सौ. शुभदा रेडकर, श्री. राजेंद्र धारपवार, श्री. उदय कदम, सौ. पूर्वा केळूसकर (वेरली) सौ. श्रद्धा वाळके, सौ. अक्षता कोरगावकर (मसुरे भोगलेवाडी) आदी शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, लक्ष्मी पेडणेकर, मयुरी शिंगरे, जोती पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स