<em>ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरात २९ जुलैला सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक - मालक संघटनेची सभा आयोजित.</em>
शिरगांव | संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची तातडीची सभा शुक्रवार दिनांक २९ जुलैला जिल्हाध्यक्ष- संजय शारबिर्दे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ – ओरोस येथील श्री. रवळनाथ मंदिर याठिकाणी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजता या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, गाव पातळीवरील अध्यक्ष, स्टँड प्रमुख, व सदस्य यांनी सभेला नियोजित वेळी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा सचिव सुधिर पराडकर यांनी केले आहे. यावेळी सभेत पुढील विषय कोकण विभागीय रिक्षा संघटनेने १ ऑगस्टला रिक्षा चालकांच्या न्याय मागण्यासाठी बंद आंदोलन पुकारले आहे. त्या संदर्भात योग्य निर्णय घेऊन, नियोजन करणे बाबत. तसेच आयत्या वेळीच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.ही सभा संपल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)