ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>“ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासापूर्तीसाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत हीच खरी अध्यापन प्रक्रिया ” – सुरेश ठाकूर.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>“ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासापूर्तीसाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत हीच खरी अध्यापन प्रक्रिया ” – सुरेश ठाकूर.</em>

प्रकाशन: 27 Jul 2022 05:53 PM
वाचन संख्या 29

मसुरे | प्रतिनिधी :
केंद्रशाळा मसुरे नं.1 चे शिक्षक व साने गुरुजी कथामाला मालवणचे सदस्य श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कथामाला मालवण व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवराज सावंत, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, ज्योती पेडणेकर, मयुरी शिंगरे,शिक्षक गोपाळ गावडे,विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, हेमलता दुखंडे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
साने गुरुजी कथामाला मालवणने राबविलेल्या कथा सांगू आनंदे- विज्ञान कथा’ या उपक्रमाने प्रेरीत होवून आपल्या विध्यार्थांना भारतीय शास्त्रज्ञांची कथारुप माहिती व्हावी या हेतूने गुरुनाथ ताम्हणकर यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तिकेत जयंत नारळीकर, मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, आर्यभट्ट, विजय भटकर, होमी भाभा, विक्रम साराभाई, रामानुजन, व्यंकट रामन या भारतीय शास्त्रज्ञांची चित्रे, चरित्रे, प्रसंग समाविष्ट आहेत.
ही आठ भारतीय संशोधकांची छोटी चरित्रे वाचून मुलांना भविष्यात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. हळूहळू त्यांना स्वतःलाच या विषयात झोकून द्यावसं वाटेल. तो क्षण आणि तो दिवस गुरुनाथ ताम्हणकरांचा ‘सोनियांचा दिनु’ असेल यात शंकाच नाही, आणि तोही लवकरच उगवेल! खरोखरच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास अशा पुस्तिका मार्गदर्शक ठरतील. ह्या आठ छोट्या चरित्रांच्या वाचन, मनन आणि चिंतनातून मुलांच्या आणि पालकांच्या मनावर वैज्ञानिकांची आठ सुंदर लेणी कोरली जातील, हे तर निश्चितच! पण त्यासोबतच माझ्या शाळेने, माझ्या शिक्षकांनी आणि आपल्या कथामालेने संपादित केलेले हे पहिले पुस्तकलेणे जे मुलांच्या मनावर कोरले जाईल, त्यांचे सौंदर्य कैलास लेण्याचेच असेल!” असे प्रतिपादन सुरेश ठाकूर यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तक प्रकाशनाबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. संस्कृती मसुरेकर हिने केले. यावेळी कु. मानसी पेडणेकर व कु. श्रेया मगर यांनी या पुस्तकातील विज्ञानकथा सांगितल्या. कु. आदित्य मेस्त्री याने ‘शिवरायांवरील पोवाडा’ सादर केला. कु. यशश्री ताम्हणकर हिने पुस्तकाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.
या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी ताम्हणकर यांचे अभिनंदन केले. आभार विनोद सातार्डेकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स