ओझरला तरुण आढळला गळफास असलेल्या मृत स्थितीत; आत्महत्या असल्याची वर्तवली जातेय शक्यता..
पोलीस तपास सुरु..
मालवण | ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी गावचे मूळ रहिवासी असणार्या समीर भगवान मुंज (वय ३७) यांनी गळफास लावून घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
समीर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आज संध्याकाळी ओझर येथील त्याच्या बंगल्यातील एका खोलीत सापडला.
घरात कोणीही नसल्याने घराच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी खिडकीतून खोलीत प्रवेश करत समीर याचा मृतदेह खाली उतरविला. समीर याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. समीर याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
समीर मुंज यांचे कोळंब येथे किराणा मालाचे दुकाने होते. मुंज यांनी जलद गतीने व्यवसायात जम बसविला होता. मुंज यांचे तोंडवळी येथेही रास्तधान्य दुकान आणि किराणा मालाचे दुकान होते. ते मनमिळावू व हसतमुख स्वभावाचा असल्याने अनेकांना परोपकारी वृत्तीने सहकार्य करत असत त्यामुळे त्यांच्या अशा अचानक निधनाने परिसरातील ग्रामस्थ व त्यांचे ग्राहकांत शोकाचे वातावरण आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही आणि पुढे पोलीस तपास सुरु झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
(फोटो सौजन्य: मालवण ब्युरो)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)