ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धबधब्यात पाय घसरुन तरुणाचा मृत्यू….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

धबधब्यात पाय घसरुन तरुणाचा मृत्यू….!

प्रकाशन: 26 Jul 2022 09:49 PM
वाचन संख्या 143

वैभववाडी | नवलराज काळे :
भुईबावडा घाटात मुख्य धबधब्यात पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंदाजे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन यशवंत चव्हाण वय २८ वर्षे रा. कापडपेठ ता. जि. सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे.

Article image


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, मयत रोहन चव्हाण आपल्या मित्रांसमवेत सांगलीहून वैभववाडी तालुक्यातील वेंगसर येथे त्यातील एका मित्रांच्या नातेवाईकांकडे चालले होते. दरम्यान भुईबावडा घाटातून येत असताना मुख्य धबधब्यात आनंद लुटण्यासाठी मयत रोहन चव्हाण धबधब्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. यावेळी पाऊस मोठा सुरू होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्यानजिकच मोरी असल्याने मोरीतून पाय घसरून मयत चव्हाण दरीत कोसळल्याने जागीच दुर्दवी अंत झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, श्री. पडेलकर वाहतूक पोलिस श्री राठोड आदी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स