मालवणात आस्था ग्रुपतर्फे समूह गीतगायन स्पर्धा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील आस्था ग्रुपच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. दोन गटात घेण्यात येणार्या या स्पर्धेत पाचवी ते दहावी आणि महाविद्यालयीन अशी चुरस रंगणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे श्री. सौगंधराज बादेकर (मालवण) 9420022890 यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आस्था गृपतर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)