ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
हिंद मराठा संघ तालुकाध्यक्षपदी रोहन रावराणेंची निवड…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हिंद मराठा संघ तालुकाध्यक्षपदी रोहन रावराणेंची निवड…!

प्रकाशन: 26 Jul 2022 09:13 PM
वाचन संख्या 58

वैभववाडी | नवलराज काळे : हिंद मराठा संघ तालुका अध्यक्ष पदी रोहन रावराणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष विशाल परब यांनी ही नियुक्ती केली. जिल्ह्यातील मराठा समाजाच्या हिताकरिता हिंद मराठा संघ कार्यरत आहे. जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारणी गठीत करण्यात येत आहे. वैभववाडी तालुका अध्यक्ष रोहन रावराणे यांची निवड करण्यात आली.
रावराणे हे विद्यमान नगरसेवक आहेत. तसेच माजी उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना संघाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणार आहे. समाजाच्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत संघाचे ध्येय धोरण पोहचविणार आहोत अशी निवडीनंतर रावराणे यांनी प्रतिक्रिया दिली .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स