ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
लोकशाहीचे 'फटकाधीश' ऋषी देसाई यांचा कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लोकशाहीचे 'फटकाधीश' ऋषी देसाई यांचा कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मान.

प्रकाशन: 26 Jul 2022 07:14 PM
वाचन संख्या 91

मुंबई | ब्युरो न्यूज : कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्यासह देवाक काळजी ह्या गाण्याचे संगीतकार विजय गवंडे यांना गौरवण्यात आले. कोकणातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘ कोकण रत्न ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. महेंद्र कामत यांना कोकण भूषण पुरस्कार, विजय गवंडे यांना कोकण कलारत्न पुरस्कार, ऋषी देसाई यांना कोकण रत्न पत्रकारिता पुरस्कार, दीपक नागवेकर यांना कोकण शिक्षणरत्न पुरस्कार, गीतेश शिंदे यांना कोकण साहित्यरत्न पुरस्कार, संतोष कासले यांना कोकण समाजरत्न पुरस्कार, श्री प्रशांत पाटणकर यांना कोकण क्रीडारत्न पुरस्कार, सत्यवान आगटे आणि योगेश गोठणकर यांना कोकण उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने यावेळी लोकशाही न्यूजच्या ऋषी देसाई यांना राजापूर लांजा तालुका नागरीक संघ अध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ऋषी देसाई यांचे लोकशाही न्यूजवर ‘सीएम मला तुमच्याशी बोलायचे आहे’ आणि ऋषी देसाईचा फटका’ हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

ॠषी देसाई यांच्या या सन्मानाने कोकण ,सिंधुदुर्ग व मालवणमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स