मालवण पोलीस निरीक्षकांनी केली मुस्लीम बांधवांशी चर्चा.
पवित्र मोहर्रम सण व ताजिया विधीच्या शांततापूर्ण संपन्नतेबद्दल केले मार्गदर्शन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात मोहर्रम हा सण एक अत्यंत महत्वपूर्ण सण असतो. गेली दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध पाळून हा सण छोट्या प्रमाणात साजरा केला गेला होता.
मालवण पोलीस निरिक्षक विजय यादव यांनी यंदा हा सण कसा उत्साहपूर्ण शांततेत साजरा करता येऊ शकेल या संदर्भात मुस्लीम बांधवांशी चर्चा, मार्गदर्शन व आढावा स्वरुपाची बैठक बोलावली होती.
मालवणमधील हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या सणाचे यंदाचे मानकरी ईम्रान मुज़ावर हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर,मोहन वराडकर तसेच मुस्लीम बांधवांचे प्रतिनिधी म्हणून मुश्ताक अथनीकर,कैसर पठाण,सलीम खान,सलीम बांगी,हसरत खान,सलाम मुजावर व इतर जण उपस्थित होते.
09 ऑगस्ट रोजी मोहर्रम सण साजरा करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)