कितीही नाठाळ येऊन देत 'विक्रम' तर होणारच..!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवशी विक्रमी सभासद नोंदणीची भेट द्यायचा आमदार वैभव नाईक यांचा निश्चय..!
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांसह साजरा होणार आहे.
त्या सोबतच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला जाणार आहे अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
शिवसेनेतून कितीही आमदार खासदार फुटले असले तरी आणि कितीही नाठाळ आले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. शिवसेनेला जनतेतूनही मोठा पाठींबा मिळत आहे. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त सभासद नोंदणीची भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गांवागावात शिवसेना सभासद नोंदणी केली जाणार आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
शिवडीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी तमाम शिवसैनिकांना हार तुरे तथा पोस्टरपेक्षा शिवसेना पक्षनोंदणी करायचे गठ्ठेच्या गठ्ठे दिसणे हीच आपली भेट असेल असे विनम्र आवाहन केले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)