ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत…!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत…!</em>

प्रकाशन: 25 Jul 2022 08:20 PM
वाचन संख्या 118

आमदार वैभव नाईक यांनी केली नियुक्ती.

कुडाळ | देवेंद्र गावडे :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी नव्याने स्थापन झालेल्या कसाल जिल्हापरिषद मतदार संघाच्या विभागप्रमुख पदी सचिन कदम व विभाग संघटक पदी संदीप सावंत यांची नेमणुक केली आहे. कसाल विभागात संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. तर पक्षाने दिलेल्या जबाबदारीला साजेसे काम करणार असल्याचे यावेळी सचिन कदम व संदीप सावंत यांनी सांगितले.

Article image


याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,माजी उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, रुपेश पावसकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,अवधूत मालणकर, छोटू पारकर,बाळा कांदळकर,डॉ. बालम, पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत, रानबांबुळी सरपंच वसंत बांबूळकर, कुंदे उपसरपंच सुशील परब, हरी वायंगणकर, विरेश परब, संतोष शिरवणकर, सुनील सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स