सावंतवाडीतील वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्यासंबंधात ॲड. संग्राम गावडे यांची गंभीर तक्रार..!
सावंतवाडी | सहिष्णू पंडित :
” तुमचा आवाज कोर्टात दाखवा;इथे नको.” असे एका वकिलाला ऊर्मट उत्तर देणा-या राजेंद्र मुरारी राणे या वाहतूक पोलीस हवालदाराची तक्रार ॲड.गावडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
दि.२६/०६/२०२२ रोजी ॲड. गावडे हे आपली चार चाकी गाडी मोतीतलावाला लागून असलेल्या रस्त्यावर लावायला जात असताना ड्युटी वर असलेल्या राजेंद्र राणे यांनी अतिशय उर्मट पणे “हा रस्ता गाडी लावायला नाही आहे आम्ही माणुसकी म्हणून लावायला देतोय” असे सांगितले. त्यावर ॲड.गावडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना,“ साहेब रोज इथे चारचाकी गाड्या लावलेल्या असतात त्यांना जर अडवलं जात नाही तर माझ्या साठी वेगळा नियम का?” अशी प्रतिक्रिया ऐकून संतापलेले राजेंद्र राणे यांनी ॲड. गावडे यांना उद्देशून “तुमचे आवाज कोर्टात दाखवायचे इथे नाही” असे सांगितले.. प्रकार चा मजकूर ॲड. गावडे यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केला आहे…
ॲड,गावडे यांच्या कार्यालयात सदर पोलीस हवालदारासंबंधात सामान्य नागरिकांकडूनही तक्रारी येत असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.राजेंद्र राणे यांच्याकडून वाहनधारकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत असून आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जावी व राणे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ॲड.संग्राम गावडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)