ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पुन्हा नव्या सरकारचा शेतकऱ्यांप्रती दिलासादायक निर्णय - विश्वनाथ नाईक.

पुन्हा नव्या सरकारचा शेतकऱ्यांप्रती दिलासादायक निर्णय - विश्वनाथ नाईक.

प्रकाशन: 21 Jul 2022 04:04 PM
वाचन संख्या 39

बांदा |राकेश परब :
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा नव्या सरकारने शेतकऱ्यांप्रती दिलासादायक निर्णय घेतला आहे. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे ५० हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान गणेश चतुर्थी अगोदर मिळावे अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सरकारकडे केली आहे.
कोकणात गणेशचतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसे खर्चाचेही निय़ोजन असते. अगोदरच्या सरकारने नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान निर्णयास नव्या सरकारने स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नव्या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती दिलासा दाखवत ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आले परंतु काहींना अद्यापही एक रुपयाही मिळाला नाही. केवळ पंचनामे केले जातात मात्र भरपाई काही मिळत नसल्याने श्री.नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहनपर ५० हजारापर्यंतचे अनुदान गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स