ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे भाजपचे यश - भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे.</em>

<em>ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे भाजपचे यश - भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे.</em>

प्रकाशन: 21 Jul 2022 01:05 PM
वाचन संख्या 52

वैभववाडी | प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण काल शिंदे-फडणवीसांच्या महायुती सरकारमुळेच पुन्हा मिळवून देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी देत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं काल ओबीसी सहित निवडणुका त्वरीत घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. तेव्हा जिल्हयातील भटके विमुक्त आघाडी व ओबीसी सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामान्य जनतेत जावून या निर्णयाची माहिती देवून जनजागृती करावी असे आवाहनही काळे यांनी केले आहे.
याशिवाय राज्यात रखडलेल्या निवडणुका तातडीनं घेण्यासंदर्भात पावलं उचलण्यास ही कोर्टानं सांगितलं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यात आरक्षण सह निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, त्या आधीच सर्वांनी प्रत्येक मतदार संघात कमळ फुलविण्यासाठी तयारीला लागा, अश्या सूचना काळे त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत.सुप्रीम कोर्टासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री.काळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स