आडवली हायस्कुलमध्ये उद्योजकता परिचय कार्यक्रम.
विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट :
जिल्हा उद्योजकता विकास केंद्र (MEDE) सिंधुदुर्ग आयोजित मालवण तालुक्यातील सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई -आडवली यांच्या सहकार्याने उद्योजकता परिचय कार्यक्रम ३० जुलैला सकाळी ठीक १०.३० वाजता आर. ए. यादव हायस्कूल आडवली या प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या उद्योजकता प्रशिक्षणासाठी फॅशन डिझायनिंग हा कोर्स निवडण्यात आला आहे तरी दशक्रोशितील सर्व प्रशिक्षणार्थींनी या उद्योजकता कार्यक्रमास कागदपत्रांसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन मुख्याध्यापक तुषार सकपाळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)