ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत..!

पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत..!

प्रकाशन: 18 Jul 2022 08:44 PM
वाचन संख्या 116

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२२ करिता या योजनेत सहभागाची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ असल्याची माहिती मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता शासनाकडून युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीठ, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूत्स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान परत करेल. या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.
संबंधित योजना ही अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी असून सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकरी विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, तसेच रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरिप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा आहे. खरिप हंगाम २०२२ व रब्बी २०२२-२३ या एका वर्षाकरिता जोखीमस्तर अधिसूचित पिकासाठी ७० टक्के करण्यात आला आहे. साधारण भात पिकाच्या ५० हजार विमा संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता रक्कम रु.१ हजार तर येत आहे.
नाचणीच्या २० हजार विमा संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता रक्कम ४०० रुपये असेल. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्थर विचारात घेऊन निश्चित केले जाईल.
विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि, एक वर्षातील देय पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्यास ११० टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्यशासन स्वीकारेल आणि जर देय पिक विमा नुकसान भरपायीची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतः कडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्यशासनाला परत करेल.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरूनच ऑनलाईन अर्ज करता येईल. पीकासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार, पिक लागवड नोंदणी प्रमाणपत्र, शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांना संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स