ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
प्रशांत पारकर यांनी दिली मसुरे केंद्रशाळेस देणगी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रशांत पारकर यांनी दिली मसुरे केंद्रशाळेस देणगी..!

प्रकाशन: 16 Jul 2022 02:43 PM
वाचन संख्या 37

दत्तक पालक योजनेतून मिळणार विद्यार्थिनीस लाभ.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक, मसुरे नं.१ शाळेचे माजी पदवीधर शिक्षक श्री. प्रशांत पारकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सा.फु.द.पा. योजनेत रोख ३०००/- देणगी देवून मसुरे नं.१ या शाळेतील एक विद्यार्थीनी दत्तक घेतली.
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ची अभिनव योजना असून या योजनेत देणगीदारांकडून ३००० रुपये जमा केले जातात. या रक्कमेच्या व्याजातून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थीनी निवडून तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती लाभ दिला जातो. त्यानंतर नवीन विद्यार्थिनीची निवड केली जाते.
श्री.पारकर यांनी यापूर्वी केंद्रशाळा मसुरे नं.१ या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी आपले आजोबा कै. राजाराम विठ्ठलशेठ पारकर यांच्या स्मरणार्थ रोख 3 हजार रुपयांची देणगी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, पदवीधर शिक्षक विनोद कदम, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे तसेच केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. पारकर सरांच्या दातृत्वाबद्दल प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर आणि पालक यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स