ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>माळगाव ग्रंथालयाच्या वतीने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>माळगाव ग्रंथालयाच्या वतीने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा.</em>

प्रकाशन: 16 Jul 2022 02:38 PM
वाचन संख्या 28

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगाव यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) सराव परीक्षेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल माळगाव येथे करण्यात आले. या परीक्षेला माळगाव केंद्रावर प्रविष्ठ होणाऱ्या माळगाव, वडाचापाट, वेरली, मसुरे, बिळवस येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
परीक्षेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल माळगाव शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा आचरेकर यांच्या हस्ते झाले. परीक्षा कामकाजासाठी श्री. प्रशांत पारकर, सौ. सेजल परब, श्री. उदय कदम, श्री. सागर मिसाळ, श्रीम.छाया नाईक, सौ. तन्वी राणे यांनी सहकार्य केले.
परीक्षेतील गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. अरुण भोगले, मुख्याध्यापक श्री.रमेश मार्गी, श्री. उदय जोशी आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक – कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (मसुरे नंबर १),
द्वितीय क्रमांक – कु. यज्ञेश संतोष परब (वडाचापाट)
तृतीय क्रमांक – कु. सायली प्रकाश पाताडे (वडाचापाट)
चतुर्थ क्रमांक – कु. सान्वी नरेंद्र हिंदळेकर (मसुरे कावा )
पाचवा क्रमांक – कु. जान्हवी दत्ताराम सावंत (मसुरे नं.१)
परीक्षेचे संयोजन ग्रंथपाल सौ. तन्वी राणे व सचिव श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स