बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात.
बांदा | राकेश परब :
बांदा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये मठात श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त मठात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी नाथवंशज प्रसाद आंबिये यांनी नाथांच्या पादुकांचे पुजन केले.तसेच उदय परांजपे यांच्या पौरोहित्याखाली अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संत सोहिरोबानाथ चरित्रामृताचे वाचन करण्यात आले.
सायंकाळी ४.०० वाजता भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या उत्सवमुर्तीची मठाभोवती वाजतगाजत पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.यावेळी ”खांद्यावर पालखी त्यात सोहिरोबा माझा.आनंदाने हालेडुले बांद्याचा हा राजा” या गजराचे गायन ज्य़ेष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन यांनी केले. नामाच्या गजरात पाच प्रदक्षिणा पूर्ण करुन पालखी मंदिरात आली. त्यानंतर आरती करुन तीर्थप्रसाद वाटण्यात आला. या सोहऴ्यासाठी नाथभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)