ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप नेते माजी खासदार डॉ.निलेश राणे यांची भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली सदिच्छा भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप नेते माजी खासदार डॉ.निलेश राणे यांची भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली सदिच्छा भेट.

प्रकाशन: 11 Jul 2022 11:20 PM
वाचन संख्या 84

मालवण | विनीत मंडलिक :
भाजप नेते माजी खासदार डॉ.निलेश राणे साहेब यांची मालवण येथील निवास स्थानी भाजप भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी 11 जुलै http://localhost/news/public/uploads/2022 रोजी मालवण तालुका दौऱ्या दरम्यान घेतली सदिच्छा भेट. या बैठकीत भारतीय जनता पार्टी विमुक्त आघाडी संघटन मजबूत करण्यासंदर्भात काय उपाययोजना कराव्या लागतील या विषयावरती चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान डॉ. निलेश राणे यांनी संघटना बांधण्यासाठी लागेल ते सहकार्य आपणास आमच्याकडून मिळेल. आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी मध्ये भटके विमुक्त आघाडीतील सर्व जाती-जमातींना जोडून द्या, त्यांच्याशी आमचा संपर्क जोडून द्या त्यानंतर त्यांच्या विकास कामांची व त्यांच्या सर्व बाबींची जबाबदारी आम्ही घेतो असा शब्द जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. एखाद्या वाडीवस्ती वरती सभेला यायचं असेल तरी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून लागेल ते सहकार्य करू त्यामुळे बिनधास्तपणे आपण आपले काम चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास देखील माजी खासदार निलेश राणे यांनी दिला . सध्या भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू असणाऱ्या कार्याचा आढावा नवलराज काळे यांनी डॉ निलेश राणे यांना दिला. त्यावर डॉ.निलेश राणे यांनी कौतुक करीत चालू असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण,भाजप भटके विमुक्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख महेश वरक,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा युवा अध्यक्ष महेश जंगले व पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स