ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>सनातन संस्थेच्या वतीने व्यापक स्तरावर गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>सनातन संस्थेच्या वतीने व्यापक स्तरावर गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.</em>

प्रकाशन: 11 Jul 2022 10:48 AM
वाचन संख्या 49

डिजीटल मंचांवरुनदेखील विविध भाषांत होणार मार्गदर्शन प्रसारण.

मालवण | प्रतिनिधी : हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘ गुरु-शिष्य परंपरा ’ राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘ हिंदु राष्ट्र ’ स्थापन करणे हा होय. हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा १३ जुलै या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात १५४ ठिकाणी प्रत्यक्ष, तर ९ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक भवन जामसंडे, जामसंडे हायस्कूल समोर, देवगड दुपारी ,३.३० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली. दुपारी ३.०० वाजता, सौ. अन्नपूर्णा मंगल कार्यालय, रेल्वे पुलाच्या बाजूला, कसाल .दुपारी ३.३० वाजता, सिद्धिविनायक मंगल कार्यालय, रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ .दुपारी ३.३० वाजता, मामा वरेरकर नाट्यगृह, ममालवण. दुपारी ३.३० वाजता साई दरबार हॉल, वेंगुर्ला. दुपारी ३.३० वाजता वैश्य भवन, गवळीतिठा, सावंतवाडी. दुपारी ३.३० वाजता जय संतोषीमाता मंगल कार्यालय, बांदा. दोडामार्ग मार्ग, बांदा दुपारी ३.३० वाजता या ८ ठिकाणी महोत्सव साजरा होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण असणार आहे. तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचे चलचित्र (व्हिडिओ) देखील दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. यांसह मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ सनातन संस्थेच्या ‘यू-ट्यूब चॅनल्स’वरून (youtube.com/SSMarathi) प्रसारित करण्यात येणार आहेत. गुरुपरंपरेचे महत्त्व समाजमनावर बिंबावे, समाज साधनेला प्रवृत्त व्हावा, तसेच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती व्हावी, यांसाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 75885 69433 क्रमांकावर संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स