आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पळसंब येथे विविध कार्यक्रमांसोबत कृषी मेळावा संपन्न…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आज आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पळसंब वरचीवाडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पुजेने झाली.
यावेळी शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी व सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते धुपाचे झाड रोपण करुन कृषी मेळाव्याचे उद्घाटन झाले.
पळसंब गावातील तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे असे मत डाॅ. मनिषा अपराज यांनी व्यक्त केले. मेळाव्याला तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, संजय गोसावी, दिनेश लंबे, कृषी पर्यवेक्षक दशरथ सावंत, डाॅ. मनिषा अपराज, चेतन प्रभू, कुरकुटे आदींचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमोद सावंत, रमेश परब, मधुकर कदम, अविराज परब, मेघःशाम परब, बाबु राऊत, सुहास राऊत, दिनेश साईल, चंद्रकांत साईल, उमेश पाडावे, उदय पाडावे, प्रथमेश परब, उमेश साईल तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)