<em>भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची "लोकसभा प्रवास योजनेची" बैठक संपन्न……!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची “लोकसभा प्रवास योजनेची” बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी – राजवाडा येथे संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रभारी रणजित देसाई व विधानसभा संयोजक महेश सारंग उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची कोअर कमिटी गठीत करण्यात आली .
यावेळी विधानसभा स्तरावरील नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक मंडल अध्यक्षांना आप-आपल्या मंडलातील पदाधिकारी यांची नावे-सोशल मीडिया टीम, मीडिया टीम, कायदा ( विधी ) , केंद्र सरकारच्या योजनांसाठीची समिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी प्रत्येक मंडल अध्यक्षांकडून बुथसक्षमीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वेंगुर्ले, बांदा, सावंतवाडी, आंबोली व दोडामार्ग मंडलातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी आणि आभार प्रदर्शन आंबोली मंडलाचे प्रभारी रविंद्र मडगांवकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)