ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने श्री सुभाष मेस्त्री यांची हिंदुजा रुग्णालयात सात लाखाची गॅन्गरीन शस्त्रक्रिया मोफत पूर्ण…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने श्री सुभाष मेस्त्री यांची हिंदुजा रुग्णालयात सात लाखाची गॅन्गरीन शस्त्रक्रिया मोफत पूर्ण…!

प्रकाशन: 07 Jul 2022 12:59 PM
वाचन संख्या 471

आमदार वैभव नाईक यांची सर्व स्तरातून होतेय प्रशंसा..

मेस्त्री कुटुंबीयांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तिरवडे येथील श्री. सुभाष सीताराम यांना डाॅक्टर्सनी गॅन्गरीन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्या नंतर श्री. मेस्त्री यांना आमदार वैभव नाईक यांनी हिंदुजा रुग्णालय येथे दाखल केले. नंतर डॉक्टरांनी या शास्त्रक्रिये करिता एकूण 7 लाख एवढा अंदाजित खर्च असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ही शस्त्रक्रिया करण्याकरिता एवढा खर्च करणे शक्य नसल्याने श्री. मेस्त्री कुटुंबिय चिंतेत होते. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री. मेस्त्री यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देऊन ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून देण्याची मागणी केली.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सात लाख खर्च असलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याचे आदेश हिंदुजा रुग्णालयास दिल्यानंतर मेस्त्री यांचे हृदयाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. ही शस्त्रक्रिया मोफत करून मेस्त्री कुटुंबियांना यामधून यशस्वीरित्या बाहेर काढण्याकरिता सहकार्य केल्याने मेस्त्री कुटुंबीयांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. मेस्त्री यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे हिंदुजा रुग्णालयास आदेश दिल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले.
जिल्ह्यातील जटील आरोग्य समस्यांच्याबाबतीत आमदार वैभव नाईक हे अतिशय स्वयंसेवाभावाने नेहमी कार्यरत असतात आणि श्री मेस्त्री यांच्या या शस्त्रक्रियेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शव आमदार वैभव नाईक यांची जिल्ह्यातील सर्व स्तरातून विशेष प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स